बातम्या

माधुरी हत्ती हस्तांतरण प्रकरण : २५ सप्टेंबरला ऑनलाईन सुनावणी

Madhuri elephant transfer case


By nisha patil - 9/23/2025 6:17:58 PM
Share This News:



माधुरी हत्ती हस्तांतरण प्रकरण : २५ सप्टेंबरला ऑनलाईन सुनावणी

कोल्हापूर : नांदणी जिनसेन मठ संस्थानवतीनं दाखल करण्यात आलेल्या माधुरी हत्ती हस्तांतरण याचिकेबाबत हाय पावर कमिटी (HPC) कडून सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

ही सुनावणी २५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. यासंदर्भात HPC चे चेअरमन व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या कडून अधिकृत मेल मठ संस्थानच्या वकिलांना प्राप्त झाला आहे.

सदर सुनावणी ही HPC चे सन्माननीय चेअरमन व सदस्य यांच्या चर्चेनंतर निश्चित करण्यात आली आहे. या सुनावणीत दाखल याचिकेबाबत मठ संस्थानला आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.


माधुरी हत्ती हस्तांतरण प्रकरण : २५ सप्टेंबरला ऑनलाईन सुनावणी
Total Views: 72