बातम्या
लवकरच नांदणी मठात परत येणार माधुरी – खासदार राजू शेट्टी
By nisha patil - 12/9/2025 2:56:43 PM
Share This News:
लवकरच नांदणी मठात परत येणार माधुरी – खासदार राजू शेट्टी
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय – माधुरी हत्तीवर उच्चस्तरीय समिती घेणार अंतिम निर्णय
माधुरी हत्तीला नांदणी मठात पाठविण्याबाबतचा निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपविण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यामुळे सोमवारीच नांदणी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे अर्ज करण्यात येणार असून लवकरच माधुरी हत्ती परत येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
आज न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारचे वकील ॲड. धर्माधिकारी यांनी माधुरीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले. मात्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने नांदणी मठात अद्यावत पुनर्वसन केंद्र उभारून तिथेच उपचार सुरू ठेवण्याचे ठरले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान पेटाच्या वकीलांनी माधुरीची तब्येत खराब असल्याचे नमूद केले. मात्र, वनताराच्या वकिलांनी माधुरी आनंदात असून तब्येत चांगली आहे, असे प्रतिवादन केले. राजू शेट्टी यांनी पेटाकडून हेतुपुरस्कर खोटा प्रसार होत असल्याचा आरोप केला.
न्यायालयाने उच्चस्तरीय समितीची कार्यकक्षा विचारली असता, ही समिती देशातील पाळीव हत्तींच्या देखरेखीची असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने माधुरी हत्तीबाबतचा सर्व निर्णय आता उच्चस्तरीय समितीने घ्यावा, असे निर्देश दिले.
लवकरच नांदणी मठात परत येणार माधुरी – खासदार राजू शेट्टी
|