बातम्या
प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून मधुरिमा गवळी यांचा भाजप उमेदवारीसाठी अर्ज
By nisha patil - 11/13/2025 6:19:41 PM
Share This News:
प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून मधुरिमा गवळी यांचा भाजप उमेदवारीसाठी अर्ज
कोल्हापूर : भाजपाचे राजारामपुरी (उत्तर) मंडल अध्यक्ष रविकिरण गवळी यांच्या पत्नी मधुरिमा गवळी यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागविण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार मधुरिमा गवळी यांनी पक्षाच्या विहित नमुन्यात अर्ज दाखल केला. त्या बुथ क्रमांक ३१५ च्या अध्यक्ष असून, गेली १३ वर्षे वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळ चौकातील कार्यालयात सतत कार्यरत आहेत.
सामाजिक कार्य आणि पक्षनिष्ठेच्या जोरावर उमेदवारी मिळावी अशी त्यांची मागणी असून, अर्ज दाखल करताना आमदार डॉ. अशोकराव माने , अमर साठे, आप्पा लाड, सयाजी आळवेकर, प्रीतम यादव, अनिल कामत, आणि अमेय भालकर उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून मधुरिमा गवळी यांचा भाजप उमेदवारीसाठी अर्ज
|