बातम्या
मधुरिमा राजे छत्रपतींचा गणेश भक्तांसोबत उत्साहाचा जल्लोष ; फुगडी-लेझीमने भक्तांमध्ये उत्साह
By nisha patil - 6/9/2025 2:50:09 PM
Share This News:
मधुरिमा राजे छत्रपतींचा गणेश भक्तांसोबत उत्साहाचा जल्लोष ; फुगडी-लेझीमने भक्तांमध्ये उत्साह
मिरवणूक शांततेत पार पडो” – गणेश भक्तांचे स्वागत करत मधुरिमा राजेंच्या शुभेच्छा
शहरातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आज मधुरिमा राजे छत्रपती यांनी थेट गणेश भक्तांमध्ये सहभागी होत उत्साहाचे वातावरण अधिकच रंगतदार केले. मिरवणुकीच्या वेळी त्यांनी गणेश भक्तांसोबत फुगडीचा आणि लेझीमचा आनंद घेतला. त्यांच्या या सहभागामुळे मिरवणुकीला खास आकर्षण प्राप्त झाले.
यावेळी मधुरिमा राजेंनी सर्व भक्तांचे मनापासून स्वागत केले तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. “गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडावी” अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.
भक्तीभाव, संस्कृती आणि आनंद यांचा संगम झालेल्या या क्षणांनी उपस्थित भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. मधुरिमा राजे छत्रपतींनी गणेश भक्तांना शुभेच्छा देत कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेत सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला.
मधुरिमा राजे छत्रपतींचा गणेश भक्तांसोबत उत्साहाचा जल्लोष ; फुगडी-लेझीमने भक्तांमध्ये उत्साह
|