बातम्या

आजऱ्यातील मडिलगे गावात बिबट्याची दहशत

Madilge


By nisha patil - 12/4/2026 10:51:33 PM
Share This News:



*आजऱ्यातील मडिलगे गावात बिबट्याची दहशत*

**बिबट्याच्या हल्ल्यात दोन श्वान ठार*

**आजरा (हसन तकीलदार )**:-आजरा येथील मडिलगे गावात आज दि. 12/04/2026 रोजी सकाळच्या सुमारास बाळू पुंडलिक हरळकर मडिलगे येथील पायरीकडील शेतात बिबट्याने हल्ला करून दोन कुत्री ठार केली असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष आनंदा घंटे यांनी आमच्या प्रतिनिधिशी संपर्क साधून दिली.

 बाळू हरळकर यांचे आनंदा घंटे यांच्या पायरीकडील शेताजवळ शेत आहे. या शेतात हरळकर यांचा गोठा असून या गोठ्यात बैले, म्हशी आणि शेळी अशी जनावरे असतात. जनावरांच्या आणि शेताच्या रखवालीसाठी बाळू हरळकर यांनी दोन कुत्री पाळली होती. काल रात्री जनावरांना वैरण पाणी करून ते आपल्या घरी मडिलगे येथे आले. त्यानंतर आज पहाटे जनवारांना वैरण पाणीसाठी आणि दुधासाठी गेले असता दोन्ही कुत्र्यापैकी एक कुत्रा बिबट्याने हल्ला करून अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला तर त्यातील दुसरा कुत्रा गायब असल्याचे समजते. याबाबत वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती घेऊन माहिती देतो असे उत्तर दिले. त्यांनी समर्पक व योग्य माहिती न दिल्याने पुढची माहिती कळू शकली नाही.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी आणि गावकाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्याचे आनंदा घंटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबत शेतकऱ्यांना घेऊन वनखात्याच्या प्रशासनाला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


आजऱ्यातील मडिलगे गावात बिबट्याची दहशत
Total Views: 521