राजकीय

आजरा तालुका संघाच्या चेअरमनपदी महादेव हेब्बाळकर

Mahadev Hebbalkar appointed as chairman of Ajra Taluka Sangh


By nisha patil - 4/24/2026 10:58:42 AM
Share This News:



आजरा तालुका संघाच्या चेअरमनपदी महादेव हेब्बाळकर


(हसन तकीलदार) - आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आाली.अध्यक्षस्थानी सहाय्यकनिबंधक सुजय कुमार होते. चेअरमन पदी महादेव हेब्वाळकर यांचे नाव माजी चेअरमन महादेव पाटील यांनी सुचवले त्यास अनुमोदन विठूलराव रामराव देसाई यांनी दिले. व्हा.चेअरमन पदासाठी संभाजी तांबेकर यंचे नाव दौलती पाटील यांनी सुचवले याला मधुकर देसाई यांनी अनुमोदन दिले.निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर महादेव पाटील, अल्बर्ट डिसोझा, डी. ए. पाटील, मधुकर देसाई तसेच संघाचे प्रमुख सुधीरभाऊ देसाई यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


निवड व सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन महादेव हेब्बाळकर आणि व्हा. चेअरमन तांबेकर यांनी म्हटले की, स्वर्गीय  राजारामबापू देसाई यांनी ज्याप्रमाणे या शेतकरी संघाला जोपासले आणि रोपट्याचे वटवृक्ष केले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन चोख कारभार करणार.


यावेळी ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई, राजाराम पाटील, राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, उदयदादा पवार,मधुकर यलगार, ज्ञानदेव पवार, सुनील देसाई, रवींद्र होडगे, जोतिबा बोलके, गणपती कांबळे, महेश पाटील, संजय उत्तूरकर, भाऊसाहेब किल्लेदार आदिजण उपस्थित होते. निवडीनंतर सहाय्य्क निबंधक यांचा सत्कार महादेव पाटील यांनी केला तर नूतन चेअरमन महादेव हेब्बाळकर यांचा सत्कार राष्ट्रवादीचे गटनेते सुधीरभाऊ देसाई यांनी केला आणि व्हा. चेअरमन संभाजी तांबेकर यांचा सत्कार मधुकर देसाई यांनी केला. आभार गणपतराव सांगले यांनी मानले.


आजरा तालुका संघाच्या चेअरमनपदी महादेव हेब्बाळकर
Total Views: 126