बातम्या
महादेवी हत्तीणीची नांदणी मठात घरवापसी निश्चित...
By nisha patil - 7/8/2025 3:05:11 PM
Share This News:
महादेवी हत्तीणीची नांदणी मठात घरवापसी निश्चित...
नांदणी मठ परिसरात उभारणार आधुनिक पुनर्वसन केंद्र
वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात उपचार घेत असलेली महादेवी हत्तीण (माधुरी) लवकरच पुन्हा नांदणी मठात परतणार आहे. यासाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.
महादेवीसाठी नांदणी मठ परिसरात वाळूचा हौद, हायड्रोथेरपी तलाव आणि लेसर थेरपीसह अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. अनंत अंबानी यांनी लोकभावनेचा आदर करत हा निर्णय घेतल्याचे वनतारा प्रशासनाचे CEO विहान करणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महादेवी हत्तीणीची नांदणी मठात घरवापसी निश्चित...
|