बातम्या
महादेवी हत्तीण नांदणी मठात परत यावी – खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय वनमंत्र्यांकडे आग्रही मागणी
By nisha patil - 7/31/2025 9:51:06 PM
Share This News:
महादेवी हत्तीण नांदणी मठात परत यावी – खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय वनमंत्र्यांकडे आग्रही मागणी
नवी दिल्ली/कोल्हापूर (ता. ३१ जुलै) – नांदणी येथील श्रद्धेचा विषय असलेली महादेवी हत्तीण पुन्हा मठात यावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
महाडिक यांनी हत्तीणीवर ग्रामस्थांचे भावनिक नाते, मठातील परंपरा आणि कोर्ट निर्णयानंतर निर्माण झालेली प्रतिक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.
खासदार महाडिक म्हणाले –
“हत्तीण परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत असून स्थानिकांच्या भावना जपण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
वनमंत्री भूपेंद्र यादव यांची ग्वाही –
“जनभावना समजून घेतली आहे. कायदेशीर तपासणीनंतर पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य तोडगा काढू.”
या बैठकीत महादेवी हत्तीणीच्या आरोग्य आणि संरक्षणाबाबतही चर्चा झाली असून या संवेदनशील प्रकरणात दोन्ही नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
महादेवी हत्तीण नांदणी मठात परत यावी – खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय वनमंत्र्यांकडे आग्रही मागणी
|