बातम्या
राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव “पुष्कराज क्षीरसागर यांच्या विवाह सोहळ्यास महाडिक कुटुंबिय यांची उपस्थिती”
By nisha patil - 11/23/2025 4:30:21 PM
Share This News:
राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव “पुष्कराज क्षीरसागर यांच्या विवाह सोहळ्यास महाडिक कुटुंबिय यांची उपस्थिती”
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. राजेशजी क्षीरसागर यांचे चिरंजीव पुष्कराज क्षीरसागर यांचा विवाह चि. सौ. कां. पूजा यांच्याशी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
या शुभविवाह प्रसंगी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मा. आ. महादेवराव (आप्पा) महाडिक साहेब सहकुटुंब उपस्थित राहिले. त्यांनी नववधू-वरांवर मनःपूर्वक शुभाशीर्वादाचा वर्षाव केला.
विवाह सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून नवदम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. उत्साह, आनंद आणि मंगलध्वनीने सोहळ्याचे वातावरण अधिक उजळून निघाले.
राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव “पुष्कराज क्षीरसागर यांच्या विवाह सोहळ्यास महाडिक कुटुंबिय यांची उपस्थिती”
|