बातम्या

महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल” – उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील

Maharajaswa Samadhan Camp is a misguidance of the people


By nisha patil - 10/9/2025 5:16:19 PM
Share This News:



महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल” – उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील

ग्रामस्थांचा प्रशासनाला प्रश्नांचा भडीमार; स्मार्ट मीटरला तीव्र विरोध

भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पार पडले. या शिबिराला पंचक्रोशीतील करडवाडी, पाथर्डी, पारधेवाडी, कुंभारवाडी यांसह परिसरातील ग्रामस्थ, सरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरादरम्यान वन विभागाच्या कामकाजावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला, स्मार्ट मीटर बसविण्याला तीव्र विरोध नोंदवला, तर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर ग्रामपंचायत सदस्यांनी ताशेरे ओढले.

या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी परखड भूमिका घेतली. “महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल करणारे अभियान आहे” असा आरोप त्यांनी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जनतेची खरी सेवा करावी, अशी सूचना दिली.

यावेळी विविध शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांना प्रमाणपत्राद्वारे देण्यात आले. विशेषतः गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत पावर वेटर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मारुती भालेकर यांच्या पत्नीला तसेच पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या सुरज मेणे यांच्या वडिलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.


महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल” – उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील
Total Views: 45