विशेष बातम्या
महाराणी येसुबाई जयंती २७ जुलै, पुण्यतिथी २१ डिसेंबर रोजी साजरी करावी – लक्ष्मीकांत राजे शिर्के यांची मागणी
By nisha patil - 7/21/2025 3:53:12 PM
Share This News:
महाराणी येसुबाई जयंती २७ जुलै, पुण्यतिथी २१ डिसेंबर रोजी साजरी करावी – लक्ष्मीकांत राजे शिर्के यांची मागणी
स्वराज्यनिष्ठ राजमाता महाराणी येसुबाई (राजमाता राजाऊ) यांची जयंती २७ जुलै आणि पुण्यतिथी २१ डिसेंबर या तारखांना साजरी करावी, अशी मागणी इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी केली आहे.
येसुबाई साहेबांच्या कार्याचा विस्मरणात गेलेला इतिहास उजळवण्यासाठी आणि समाजाला प्रेरणा देण्यासाठी ह्या तारखा निश्चित करून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक पातळीवर कार्यक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शिर्के घराण्याच्या वंशजांनी येसुबाईंचा अधिकृत छायाचित्रही जाहीर केला असून, येसुबाईंच्या मूळगावी शृंगारपूर येथे जयंती आणि संगम माहुली येथील समाधीस्थळी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे.
"राज्यभरात शिव-शंभुभक्तांनी पुढाकार घ्यावा," असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
📞 अधिक माहिती व संपर्क:
श्रीमंत लक्ष्मीकांत राजे शिर्के – 9623684898
महाराणी येसुबाई जयंती २७ जुलै, पुण्यतिथी २१ डिसेंबर रोजी साजरी करावी – लक्ष्मीकांत राजे शिर्के यांची मागणी
|