बातम्या
महाराष्ट्र दिनानिमित्त मलिग्रेत आरोग्य शिबीर संपन्न
By nisha patil - 1/5/2026 10:18:32 PM
Share This News:
**महाराष्ट्र दिनानिमित्त मलिग्रेत आरोग्य शिबीर संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:- मलिग्रे येथे महाराष्ट्र दिनानिमित्ताने संयुक्त वाघाची तालीम मंडळ आयोजित व संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल,महागाव याच्या माध्यमातून मोफत महाआरोग्य शिबीरामध्ये सर्व आजारांची तपासणी मल्लिकार्जुन मंदिर मलिग्रे संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परीषद सदस्य सुधीरभाऊ देसाई यानी आरोग्य शिबिराला भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. आरोग्य शिबिरासाठी डॉ.मनिषा सुतार, डॉ.पुजा मळेकर, डॉ.समृध्दी पवार, नुतन पाटील, रविना आचरेकर, कौसर नदाफ, प्रियांका गावित, शिबीर व्यवस्थापक पंकज खानापूरे मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव, सरपंच शारदा गुरव, अशोक शिंदे, आनंदा बुगडे, आप्पाजी नेसरीकर याच्यासह लाभार्थी ग्रामस्थ उपस्थीत होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त मलिग्रेत आरोग्य शिबीर संपन्न
|