राजकीय

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र (दादा) चव्हाण यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन — मजले हेलिपॅडवर आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी केले मनस्वी स्वागत

Maharashtra BJP State President Ravindra Chavan arrives in Kolhapur district


By nisha patil - 11/29/2025 1:47:29 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र (दादा) चव्हाण हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवकांच्या प्रचारार्थ खास दौऱ्यावर कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. भाजपाची संघटनात्मक मजबुती, स्थानिक उमेदवारांना साथ आणि निवडणूक प्रचाराला गती देण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

दादांच्या या आगमनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाच्या झेंड्यांनी सुशोभित परिसरात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी मजले हेलिपॅड येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून दादांचे मनःपूर्वक स्वागत केले. हेलिपॅडवर आगमन होताच त्यांनी पुढे येऊन सदिच्छा भेट देत चव्हाण यांच्याशी थोडक्यात चर्चा केली. राजकीय घडामोडी, प्रचाराची रणनीती आणि जिल्ह्यातील विकासकामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद झाला.


महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र (दादा) चव्हाण यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन — मजले हेलिपॅडवर आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी केले मनस्वी स्वागत
Total Views: 46