बातम्या

‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

Maharashtra Day and Workers Day celebrated in Gokul


By nisha patil - 2/5/2025 4:20:05 PM
Share This News:



‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

कोल्‍हापूर, ता.०१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बोलताना कॉम्रेड उमेश सूर्यवंशी म्हणाले कि, महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेत व मुंबई शहराच्‍या जडण-घडणीमध्‍ये कामगारांनी अतुलनिय योगदान दिले आहे. गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे. कामगारांनी त्यांचे कर्तव्य प्रामणिकपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयन्न करावे असे मत युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

 कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांच्या हस्ते युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉ.संदेश पाटील यांनी केले तर आभार कॉ. शाहीर सदाशिव निकम यांनी मानले.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (खरेदी) मोळक, विभाग प्रमुख (स्टोअर) सुनिल कारंडे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, कॉ.व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ.अशोक पुणेकर, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संदेश पाटील, कॉ.संभाजी शेलार, कॉ.लक्ष्मण आढाव, कॉ.योगेश चौगुले, कॉ.कृष्णा चौगुले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.   
 


‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
Total Views: 238