बातम्या

महाराष्ट्र शेतकरी संघटनेने राज्यव्यापी दूध आणि भाजीपाला बंद पुकारला,  कर्जमाफीची मागणी

Maharashtra Farmers


By nisha patil - 4/18/2025 4:25:25 PM
Share This News:



महाराष्ट्र शेतकरी संघटनेने राज्यव्यापी दूध आणि भाजीपाला बंद पुकारला, 
कर्जमाफीची मागणी

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेने राज्यभरात दूध आणि भाजीपाला खरेदी-विक्री बंद ठेवण्याचे ठरवले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली १९ आणि २० एप्रिल रोजी हा बंद करण्यात येणार आहे.

या बंदमध्ये भाजीपाला आडत दुकानदार, किरकोळ विक्रेते, दूध डेअरी चालक-मालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शेतकरी संघटना सरकारकडून कर्जमाफीची तातडीने मागणी करत आहे. शेतकरी, दूध डेअरी चालक, भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांची मोहीम यशस्वी होण्यासाठी राज्यभर संघटनेचे पदाधिकारी काम करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निवेदन पाठवून कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी राज्यभर दूध आणि भाजीपाला मिळणार नाही, अशी शक्यता आहे.


महाराष्ट्र शेतकरी संघटनेने राज्यव्यापी दूध आणि भाजीपाला बंद पुकारला,  कर्जमाफीची मागणी
Total Views: 127