बातम्या

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत

Maharashtra Teacher Eligibility Test goes smoothly


By nisha patil - 11/24/2025 4:20:31 PM
Share This News:



महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत 

कोल्हापूर, दि. 24  : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 रविवार, 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 1 हजार 423 केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व 2 साठी एकूण 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 4 लाख 46 हजार 730 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित राहिले.

परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. तसेच जिल्हा स्तरावरुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण निरीक्षक आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयामुळे परीक्षेचे कामकाज विना तक्रार पार पडले. 


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत
Total Views: 15