विशेष बातम्या
लाल किल्ला स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड; हनी ट्रॅपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न
By nisha patil - 12/31/2025 11:45:32 AM
Share This News:
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ घडलेल्या स्फोट प्रकरणात आता एक महत्त्वाचा महाराष्ट्राशी संबंधित धागा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जुबैर हंगेरकर याने महाराष्ट्रातील दोन महिलांशी हनी ट्रॅपच्या माध्यमातून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपास यंत्रणांनी उघड केली आहे.
स्फोटाच्या आधी महाराष्ट्रात काही संशयास्पद हालचाली झाल्याचे प्राथमिक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले असून, या पार्श्वभूमीवर पुढील तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. जुबैर हंगेरकरचे महाराष्ट्रातील संपर्क, त्याचे हालचाली आणि मागील व्यवहार यांचा सखोल तपास केला जात आहे.
महाराष्ट्रातील महिलांनाच लक्ष्य करण्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता, हनी ट्रॅपमागे कोणता मोठा कट रचण्यात आला होता आणि या सर्व घटनांचा दिल्लीतील स्फोटाशी नेमका काय संबंध आहे, या दिशेने तपास यंत्रणा काम करत आहेत.
हे महाराष्ट्र कनेक्शन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानले जात असून, या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणानंतर स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढवण्यात आली आहे.
लाल किल्ला स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड; हनी ट्रॅपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न
|