बातम्या

जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Maharashtra din


By nisha patil - 8/5/2025 12:40:44 PM
Share This News:



जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा परिषद कोल्हापूरच्या मुख्यालय प्रांगणात १ मे २०२५ रोजी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा. श्री. कार्तिकेयन एस. यांच्या शुभहस्ते सकाळी ७.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यानंतर जि.प. कर्मचारी कलामंच यांच्यावतीने देशभक्तिपर गीतांची सुरेल प्रस्तुती देण्यात आली.

या प्रसंगी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनीषा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक माधुरी परिट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सागांवकर, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) अर्जुन गोळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, तसेच उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम शिस्तबद्ध, सौहार्दपूर्ण व देशभक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.


जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
Total Views: 176