ताज्या बातम्या

लंडनमधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ खरेदी करणार महाराष्ट्र सरकार

Maharashtra government to buy historic


By nisha patil - 11/13/2025 12:09:16 PM
Share This News:



भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी जोडलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ हे ऐतिहासिक ठिकाण आता महाराष्ट्र सरकार खरेदी करणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याशी निगडित असलेली ही वास्तू राज्य सरकार स्मारक म्हणून जतन करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी दिली.

सांस्कृतिक कार्यमंत्री आ. शेलार हे नागपूरच्या रघुनाथराजे भोसले यांची ऐतिहासिक वस्त्रे लंडनमध्ये आणण्यासाठी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी इंडिया हाऊसबाबतची माहिती घेतली. लंडनस्थित भारतीय समुदाय आणि तिथल्या प्रतिनिधींशी चर्चेनंतर शेलार यांनी ही इमारत खरेदी करण्याच्या प्रक्रियेबाबत पुढाकार घेतला.

या संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, आणि पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारचा उद्देश या वास्तूचे संवर्धन करून ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे स्मारक म्हणून विकसित करण्याचा आहे. या माध्यमातून पुढील पिढ्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील परदेशातील योगदानाची प्रेरणा मिळावी, असा हेतू आहे.


लंडनमधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ खरेदी करणार महाराष्ट्र सरकार
Total Views: 53