बातम्या
अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने मोठा नेता गमावला – हसन मुश्रीफ
By Administrator - 1/28/2026 4:34:13 PM
Share This News:
अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने मोठा नेता गमावला – हसन मुश्रीफ
नामदार अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नावाप्रमाणेच ते आम्हा सर्वांचे खऱ्या अर्थाने “दादा” होते. एक मित्र, एक भाऊ आणि एक प्रभावी नेता अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी कार्यकर्ते व जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सक्षम प्रशासक, जनतेविषयी प्रचंड आस्था व तळमळ असलेला दूरदृष्टीचा प्रगल्भ नेता कायमचा गमावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले, मार्गदर्शित झाले.
“आमचा दादा आम्हाला पोरकं करून गेला. हा आघात इतका मोठा आहे की, या दुःखातून सावरता येत नाही,” अशा भावनिक शब्दांत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त
अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने मोठा नेता गमावला – हसन मुश्रीफ
|