बातम्या
ऊर्जा परिवर्तनामुळे महाराष्ट्र देशातील ‘रोल मॉडेल’ – परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे गौरवोद्गार
By nisha patil - 4/9/2025 5:30:27 PM
Share This News:
ऊर्जा परिवर्तनामुळे महाराष्ट्र देशातील ‘रोल मॉडेल’ – परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे गौरवोद्गार
मुंबई, दि. ४ : पारंपरिक इंधनांऐवजी सौर ऊर्जेला प्राधान्य देत महाराष्ट्राने देशात ऊर्जा परिवर्तनाची आघाडी घेतली असून, राज्य हे देशाच्या विद्युत क्षेत्रातील ‘रोल मॉडेल’ ठरले आहे, असे परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले.
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या मुंबई भेटीदरम्यान महावितरण व महानिर्मितीच्या सौर प्रकल्प व योजनांची माहिती देण्यात आली.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की –
-
२०३० पर्यंत ४५ हजार मेगावॅट वीज उत्पादन, त्यापैकी ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जा.
-
३ लाख ३० हजार कोटींची गुंतवणूक, सुमारे ७ लाख रोजगार निर्मिती.
-
वीज खरेदीत पुढील ५ वर्षांत ८२ हजार कोटींची बचत.
-
सर्व वर्गवारीतील वीज दरात घट होणार.
-
कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत.
मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० अंतर्गत २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट सौर वीज निर्मिती होऊन राज्यातील ४५ लाख कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. यामुळे ६५ हजार कोटींची गुंतवणूक व ७० हजार रोजगार ग्रामीण भागात निर्माण होणार आहेत.
याप्रसंगी महावितरण, महानिर्मिती व महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ऊर्जा परिवर्तनामुळे महाराष्ट्र देशातील ‘रोल मॉडेल’ – परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांचे गौरवोद्गार
|