बातम्या
महाराष्ट्रात जुलैत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता
By nisha patil - 2/7/2025 4:58:33 PM
Share This News:
महाराष्ट्रातील घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी 2 जुलै रोजी अतीवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण आणि विदर्भासह मध्य भारतातील भागांत गेल्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी 2 पुढच्या 24 तासांत अतीवृष्टीची शक्यता आहे. इथे मेघगर्जनेसह वीजा आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारा वाहण्याचीही शक्यता आहे.
उत्तर कोकणातही काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह वीजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात जुलैत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता
|