खेळ
महाराष्ट्राची सुवर्णकन्या – जिजाऊ पाटीलची हॅटट्रिक!
By nisha patil - 8/26/2025 3:11:48 PM
Share This News:
महाराष्ट्राची सुवर्णकन्या – जिजाऊ पाटीलची हॅटट्रिक!
आंतरराष्ट्रीय रंगमंचावर झळकलेली आसगावची मुलगी
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील १३ वर्षीय खेलो इंडिया ऍथलीट व फेन्सिंगपटू जिजाऊ पाटील हिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावत सुवर्ण हॅटट्रिक साधली आहे.
हिंगोली येथे झालेल्या सब-ज्युनियर फॉइल स्पर्धेत तिने हॅटट्रिक केली, तर संभाजीनगर येथे झालेल्या कॅडेट राज्यस्तरीय स्पर्धेत वैयक्तिक व टीम सुवर्ण पटकावून दुहेरी यश मिळवले. या कामगिरीमुळे तिची पांडिचेरी व उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर पाच पदके आणि थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकून तिने आपल्या क्षमतेची छाप उमटवली होती. अलीकडेच इटलीतील Frascati Scherma Academy मध्ये ऑलिंपिक विजेते व्हॅलेरियो अॅस्प्रोमोंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू होण्याचा मान तिला मिळाला आहे.
दररोज ६-७ तास सराव आणि शिक्षणातही तितकीच प्रगती हे तिचे वैशिष्ट्य. कुटुंब, प्रशिक्षक आणि भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या पाठबळामुळे तिची कामगिरी शक्य झाली आहे. भविष्यात भारतासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्याचे जिजाऊचे लक्ष्य आहे.
महाराष्ट्राची सुवर्णकन्या – जिजाऊ पाटीलची हॅटट्रिक!
|