ताज्या बातम्या
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी: डॉ सारिका कांबळे
By nisha patil - 2/1/2026 3:32:58 PM
Share This News:
कोल्हापूर :- कर्मवीर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील हिंदी विभागातील प्राध्यापिका डॉ.सारिका राजाराम कांबळे यांनी केले.कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संशोधन केंद्रितर्फे आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज त्यांना श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कर्मवीर विठ्ठलाची शिंदे सभागृहात अभिवादन करण्यात आले.
डॉ.सारिका कांबळे म्हणाले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य, मुलींचे शिक्षण विषयक कार्य, अस्पृश्यता निवारणाचे कार्य, दारूबंदी चळवळ ,होळी का संमेलन, शेतकऱ्यांविषयक कार्य, गुन्हेगार जातींना विकासाच्या प्रवाहात आणण्याबाबतचे कार्य, व्हायकोनचा सत्याग्रह इत्यादी कार्य आजही प्रेरणादायी आणि आदर्शवत आहेत . त्या कार्यांची आजही गरज आहे.
प्राचार्य डॉ. आर.के शानेदिवाण म्हणाले, आज भारत स्वतंत्र आहे. परंतु देशातील प्रत्येकालाच आपले संविधानातील स्वातंत्र्य अजून प्रत्यक्षात मिळालेली नाही. 31 डिसेंबरला दारूचा महापूर वाहत होता. सरकारने रात्रभर दारू दुकाने सुरू ठेवली होती.हे कसले लोक कल्याणकारी राज्य. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यावेळी दारूबंदीची चळवळ उभारली होती. महात्मा गांधींनी तर दारूबंदीसाठी कायमचा आग्रह धरला होता. त्यामुळे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन कार्य आज ही गरजेचे आहे.
स्वागत व प्रास्ताविक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी: डॉ सारिका कांबळे
कोल्हापूर: कर्मवीर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील हिंदी विभागातील प्राध्यापिका डॉ.सारिका राजाराम कांबळे यांनी केले.कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संशोधन केंद्रितर्फे आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज त्यांना श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कर्मवीर विठ्ठलाची शिंदे सभागृहात अभिवादन करण्यात आले.
डॉ.सारिका कांबळे म्हणाले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य, मुलींचे शिक्षण विषयक कार्य, अस्पृश्यता निवारणाचे कार्य, दारूबंदी चळवळ ,होळी का संमेलन, शेतकऱ्यांविषयक कार्य, गुन्हेगार जातींना विकासाच्या प्रवाहात आणण्याबाबतचे कार्य, व्हायकोनचा सत्याग्रह इत्यादी कार्य आजही प्रेरणादायी आणि आदर्शवत आहेत . त्या कार्यांची आजही गरज आहे.
प्राचार्य डॉ. आर.के शानेदिवाण म्हणाले, आज भारत स्वतंत्र आहे. परंतु देशातील प्रत्येकालाच आपले संविधानातील स्वातंत्र्य अजून प्रत्यक्षात मिळालेली नाही. 31 डिसेंबरला दारूचा महापूर वाहत होता. सरकारने रात्रभर दारू दुकाने सुरू ठेवली होती.हे कसले लोक कल्याणकारी राज्य. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यावेळी दारूबंदीची चळवळ उभारली होती महात्मा गांधींनी तर दारूबंदीसाठी आग्रह धरला होता कायमचा आग्रह धरला होता त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन कार्य आज ही गरजेचे आहे .
स्वागत प्रास्ताविक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. सरोज पाटील यांनी केले. या संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली .सूत्रसंचालन व आभार डॉ. पुनम भुयेकर यांनी मांनले. डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ.के.एम.देसाई सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी: डॉ सारिका कांबळे
|