बातम्या
दत्तवाड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 1/5/2025 5:35:40 PM
Share This News:
दत्तवाड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
दत्तवाड (ता. शिरोळ) येथे महात्मा बसवेश्वर जयंती २५ ते ३० एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उदगीर (लातूर) येथील कथाकार मा. श्री. शिवानंद हैबतपुरे यांचे बसवकथांचे प्रवचन आणि हजारो भक्तांसाठी अन्नदासोह झाला.
३० एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी अभिषेक, बसवज्योती मिरवणूक, ध्वजारोहण, भजन, जन्मकाळ सोहळा, प्रसाद वाटप आणि सायंकाळी पारंपरिक वाद्य, रथ, लेझीम, घोडे, वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिला, बालक व नागरिकांच्या मोठ्या सहभागाने हा उत्सव जल्लोषात पार पडला.
दत्तवाड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
|