बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.
By nisha patil - 2/10/2026 11:56:05 PM
Share This News:
व्यंकटराव शिक्षण संकुल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.
*आजरा(हसन तकीलदार):-येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व हरितक्रांतीचे जनक लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन जयवंत शिंपी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जगाला आज खरोखरच गांधी विचारांची गरज आहे. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा विचार संपूर्ण जगाने आज घेतला ही खरी मोठी आपल्या भारताची पोचपावती आहे.असे विचार जयवंत शिंपी यांनी बोलताना आपल्या मनोगतनातून व्यक्त केले. जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांचे सुद्धा देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मतही त्यांनी मांडले. यावेळी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या परिपत्रकानुसार नशामुक्ती या विषयावर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.मार्गदर्शक म्हणून एस.एस. कालेकर यांनी काम केले. कार्यक्रमाचे नियोजन व्यंकटराव महाविद्यालय व व्यंकटराव हायस्कूल नववी ड विद्यार्थी व मार्गदर्शिका सौ. ए.एस. गुरव यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष के. जी.पटेकर खजिनदार सुनील पाटील संचालक सुधीर जाधव , सचिन शिंपी, अशोक पोवार,प्रभारी प्राचार्य चंद्रकांत पन्हाळकर,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजयकुमार पाटील,पर्यवेक्षिका व्ही. जे.शेलार, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.एन. ए. मोरे, सौ.एस.डी.इलगे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते सूत्रसंचालन आर.पी.होरटे यांनी केले.
व्यंकटराव शिक्षण संकुल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.
|