बातम्या
महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन...
By nisha patil - 2/10/2025 1:47:21 PM
Share This News:
इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. राहुल आवाडे हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी जगाला सत्य, अहिंसा व स्वच्छतेचा संदेश दिला तर लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान – जय किसान या घोषणेद्वारे देशाच्या प्रगतीचा पाया मजबूत केला. या दोन्ही महान नेत्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी आदरांजली असल्याचे आमदार साहेबांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या दोन महान विभूतींना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन...
|