बातम्या
विवेकानंद महाविदयालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
By nisha patil - 2/10/2025 3:00:17 PM
Share This News:
विवेकानंद महाविदयालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
कोल्हापूर दि. 2 : येथील विवेकानंद महाविदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा गांधीजींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ.एस.पी.थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. दत्ता जाधव यांनी केले.
यावेळी डॉ. दत्ता जाधव म्हणाले, सत्य्, अहिसा व सत्याग्रह या चिरकालीन संकल्पना जगासमोर मांडल्या. या तत्वांना महात्मा गांधी यांनी जीवनात खूप महत्व् दिले. धर्मनिरपेक्षता आणि मानवता याचबरोबर संघटितपणा यासाठी गांधीजींची विचारसरणी आजही उपयुक्त आहे.
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यानी जय जवान जय किसान हा नारा देऊन संपूर्ण शेतकऱ्यांना सबल करण्याचे कार्य केले. आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. त्याबाबत लाल बहादूर शास्त्रींचे विचार मार्गदर्शक आहेत. देशातील गोरगरीबांची सेवा करणे हीच त्याना आदरांजली ठरेल. महात्मा गांधी जयंती स्वच्छता सप्ताह निमित महाविद्यालयाच्या एन.एस.एस. व एन.सी.सी. विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र् विभागातर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविदयालयातील स्टाफ सेक्रेटरी, ज्युनिअर व सिनिअर कॉलेज प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, एन.सी.सी. एन.एस.एस.चे विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद महाविदयालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
|