बातम्या

महात्मा गांधीजींचे ग्राम विकासाचे काम आजही प्रेरणादायी : डॉ.ए.बी.वर्धन

Mahatma Gandhis work for rural development remains


By Administrator - 1/30/2026 5:39:33 PM
Share This News:



महात्मा गांधीजींचे ग्राम विकासाचे काम आजही प्रेरणादायी : डॉ.ए.बी.वर्धन

 शहाजी महाविद्यालयात गांधीजींना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ग्रामविकासाचे संरचनात्मक काम आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. ए. बी. वर्धन यांनी केले. दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज  राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना पुण्यतिथी  दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या व्याख्यानात गांधीजींना समजून घेताना या व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
 

डॉ. ए.बी.वर्धन म्हणाले , गांधीजींचे ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, ग्राम संस्कृती, अस्पृशता निर्मूलन, शेतकरी, महिला यांच्या विषयी त्यांचे काम खूप मोठे आहे .हे संरचनात्मक काम आजही प्रेरणादायी असे आहे. गांधीजींनी विविध प्रयोगातून हे कार्य केले होते.  स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे काम अतुलनीय होते .
   

डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी, गांधीजींच्या वर अडीचशे पानांचे पुस्तक लिहीत असल्याचे सांगितले. गांधीजी भारतातीलच नव्हे तर विश्वातील एक अत्यंत प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होते. ते सत्यशील ,प्रामाणिक आणि कृतिशील समाजसेवक होते. आजच्या परिस्थितीतही त्यांचे विचार अत्यंत उपयोगी आणि प्रेरणादायी असे आहेत .व्यसनाधीनते पासून दूर राहण्याचा दिलेला संदेश आजही अत्यंत उपयुक्त आहे. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, आईन्स्टाईन यांनाही गांधीजींचे महत्त्व माहीत होते. त्यांनी गांधीजींना आपले प्रेरणास्त्रोत मानले होते. 
   

स्वागत व प्रास्ताविक समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.विशाल कुरणे यांनी केले. सूत्रसंचालन भाटे मॅडम यांनी  केले.  डॉ. ए.बी.बलूगडे यांनी आभार मानले. 
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले. 
आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर, डॉ. दीपक कुमार वळवी, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी यावेळी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 
शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने गांधीजींच्या जीवन कार्यावरील ग्रंथांचे प्रदर्शन यावेळी संपन्न झाले.


महात्मा गांधीजींचे ग्राम विकासाचे काम आजही प्रेरणादायी : डॉ.ए.बी.वर्धन
Total Views: 12