बातम्या
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी करणार निदर्शने l
By nisha patil - 12/10/2026 3:04:37 PM
Share This News:
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी करणार निदर्शने l
*आजरा(हसन तकीलदार) मतदार याद्या पुनर्निरीक्षण आणि मतचोरीसाठी सत्ताधाऱ्यांना मदत करणाऱ्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभर तरुण मुले मुली रस्त्यावर उतरली आहेत. शांततेच्या मार्गाने लोकशाही टाकावी म्हणून आंदोलनात उतरलेल्या या मुलांना पोलीस बळाचा वापर करून हिंसक पद्धतीने ताब्यात घेतले जात आहे.
लोकशाहीसाठी लढणाऱ्या या तरुणाईच्या सोबत आम्ही आहोत, हे सांगण्यासाठी मंगळवार दि.१३ रोजी छत्रपती संभाजी चौकात महाविकास आघाडीतर्फे भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.सरकारची दडपशाही मोडून काढण्यासाठी सर्वानी वेळेवर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे जमावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडी करणार निदर्शने l
|