बातम्या

महावितरणचा २१ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

Mahavitaran 21 vardapandin


By nisha patil - 6/6/2026 2:31:06 PM
Share This News:



*कर्तव्याचे पालन करताना ‘ग्राहक देवो भव:’ हे सूत्र जपा - स्वप्नील काटकर*

महावितरणचा २१ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा*

कोल्हापूर, दि. ०६ जून २०२६ :* ‘कोल्हापूर परिमंडल हे राज्यात अनेक मापदंडात अग्रस्थानी आहे, याचे सर्वस्वी श्रेय हे आपले ग्राहक व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे. तंत्रज्ञानस्नेही बनत वीज ग्राहकांप्रती कर्तव्याचे पालन करताना ‘ग्राहक देवो भव:’ हे सूत्र जपा,’ असे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केले.

वर्धापन दिनानिमित्त ताराबाई पार्क कोल्हापूर येथील परिमंडल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत

मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार महावितरणचा २१ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूर मंडल कार्यालायचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पुनम रोकडे, कार्यकारी अभियंते अभिजीत सिकनीस, म्हसू मिसाळ, दत्तात्रय भणगे, अजित अस्वले, निलेश चालिकवार, संगणक प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.

 

मुख्य अभियंता स्वप्नील काटकर पुढे म्हणाले, ‘महावितरण ही जनतेची कंपनी असून या कंपनीस आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या आघाडीवर ठेवण्याची सर्वांची जबबदारी आहे. आपणास येत्या दोन महिन्यात ग्राहकांशी संवाद साधत परिमंडलात १०० टक्के टीओडी स्मार्ट मीटर बसवायचे आहेत. यामुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहेत तसेच अचूक बिलिंगमुळे महावितरण कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. तंत्रज्ञान स्नेही बनताना ग्राहकांच्या सेवेत मानांकन प्रक्रियेचा कालावधी पाळा.’ 

 

याप्रसंगी बोलताना अधीक्षक अभियंता गणपत लटपटे म्हणाले, ‘ग्राहक सेवेत व कंपनीच्या प्रगतीत सर्व घटकांचे योगदान आहे. कोल्हापूर जिल्ह्याची देयक क्षमता राज्यात अव्वल आहे. तसेच कर्मचारी अपघाताचे प्रमाण गेल्या दोन वर्षात शून्यावर आले आहे.’ 

 

कार्यक्रमाच्या सुरवातीस सर्वांनी विद्युत सुरक्षिततेची शपथ घेतली. यावेळी संजीवन ब्लड सेंटर कोल्हापूरद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यात चार महिलांचा समावेश होता. रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात आले. अथायू हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व डॉ. अग्रवाल आय केअर सेंटर यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


महावितरणचा २१ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा
Total Views: 19