बातम्या
महावितरणकडून विद्युत सहायक पदांची निवड यादी जाहीर
By nisha patil - 8/16/2025 5:07:58 PM
Share This News:
महावितरणकडून विद्युत सहायक पदांची निवड यादी जाहीर
२० ते २२ ऑगस्ट दरम्यान कागदपत्र पडताळणी
मुंबई, दि. १६ ऑगस्ट : राज्यातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५,३८१ उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी येत्या २०, २१ व २२ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये सकाळी १० वाजता सुरू होईल. उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे, अर्हताप्रमाणपत्रे व ओळखपत्रासह स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची निवड आपोआप रद्द होईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अंतर्गत विद्युत सहायक या पदासाठी मे २०२५ मध्ये ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी निकाल व सूचनांसह निवड झालेल्या उमेदवारांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. यादीतील उमेदवारांचे परिमंडलनिहाय वर्गीकरण १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले होते.
आता कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात पुढील कार्यवाही संबंधित परिमंडलामार्फत करण्यात येणार आहे. या प्रक्रियेबाबतची सर्व माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महावितरणकडून विद्युत सहायक पदांची निवड यादी जाहीर
|