विशेष बातम्या
महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा !
By nisha patil - 4/11/2025 4:37:08 PM
Share This News:
महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा !
अधिकारी-कर्मचारी यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न
कोल्हापूर/ सांगली दि.04 नोव्हेंबर 2025 : दररोजच्या कामातून येणारे ताण-तणाव कमी करण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या करिता मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. त्यास वीज कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने वीज कर्मचाऱ्यांचा फक्त ताण-तणावच दूर केला नाही तर त्यांना नवी ऊर्जा सुद्धा दिली. हा कार्यक्रम राधाकृष्ण पॅलेस शहापुर, कोडोली- बोरपाडळे रोड (ता. पन्हाळा) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले. यावेळी बोलताना श्री.स्वप्नील काटकर म्हणाले, ‘या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा. यातून प्राप्त होणारी ऊर्जा आपणास नियमित कामात वापरून कोल्हापूर परिमंडलास कायम प्रथम क्रमांकावर ठेवायचे आहे.’ याप्रसंगी मंचावर अधीक्षक अभियंते गणपत लटपटे (कोल्हापूर), अमित बोकील (सांगली), श्रीमती पुनम रोकडे (पायाभूत आराखडा) यांच्यासह सहा. महाव्यवस्थापक शशिकांत पाटील (मासं), कार्यकारी अभियंते सुनील गवळी, म्हसु मिसाळ, अजित अस्वले, दत्तात्रय भणगे, विजयकुमार आडके, अशोक जाधव, सुधाकर जाधव, आशिष मेहता, सुरेश सवाईराम, वैभव गौंदिल, संजय पवार, सागर मारुळकर,निलेश चालीकवार व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांची उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर हास्यसम्राट संभाजी यादव (कौलव) यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला. दुसऱ्या सत्रात सचिन वाडकर व ज्योती वाडकर यांचा महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनीस्टर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी त्यांच्या कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बालगोपालांसाठी खेळण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता श्री. प्रसाद दिवाण यांनी केले.
महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा !
|