ताज्या बातम्या

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित

Mahavitaran employees strike temporarily suspended


By nisha patil - 10/10/2025 1:33:02 PM
Share This News:



नागपूर, दि. १० ऑक्टोबर २०२५ :-  महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीने सुरू केलेला ७२ तासांचा संप अखेर २४ तासांनंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृती समितीने हा निर्णय घेताना महावितरणच्या संचालक (संचलन) व संचालक (मा.सं.) यांनी केलेल्या आवाहनाचा आदर राखला आहे. तसेच व्यवस्थापनाच्या पत्र क्र. ३२८९१ नुसार गोषवाऱ्यात करण्यात आलेल्या सुधारणा, १४ व १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाटाघाटींच्या तारखा निश्चित झाल्यामुळे आणि कामगार आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर दिलेल्या आदेशाचा विचार करून संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

कृती समितीतील सातही संघटनांनी एकमताने हा निर्णय घेतला असून, आता पुढील वाटाघाटीनंतर संपावर अंतिम निर्णय घेतला जाईल.


महावितरण कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित
Total Views: 395