बातम्या
राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणच्या खेळाडूंची बाजी
By nisha patil - 4/21/2025 3:50:05 PM
Share This News:
राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणच्या खेळाडूंची बाजी
ॲथलेटिक्स, कॅरम व हॉलिबॉल स्पर्धेत 33 पदकांवर कोरले नाव
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 46 व्या राष्ट्रीय स्पर्धेचा समारोप
कोल्हापूर : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 46 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणच्या राज्यभरातील खेळाडूंनी ॲथलेटिक्स, कॅरम व हॉलिबॉल स्पर्धेत 33 पदकांवर नाव कोरले. यामध्ये महावितरणने एकूण 15 सुवर्ण, 11 रौप्य व 7 कांस्य पदके प्राप्त केली. या राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून हिमाचल प्रदेशच्या सुरेश कुमार यांना तर हॉलीबॉल बेस्ट स्मॅशर म्हणून महावितरणच्या समीर अली शेख यांना गौरविण्यात आले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरु असलेल्या देशातील विविध विद्युत कंपन्यांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा शनिवारी (दि. 17) समारोप झाला.
विजेत्या खेळाडूंना महानिर्मितीचे संचालक प्रकल्प अभय हरणे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय कुराडे उपस्थित होते. या राष्ट्रीय स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाला आयोजन समितीच्या अध्यक्षा व महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे उपाध्यक्ष भारत पाटील, खजीनदार ललित गायकवाड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी व संजय पाटील यांनी केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी समितीचे सचिव महावितरणचे शिरीष काटकर, महानिर्मितीचे प्रसाद निकम व महापारेषणचे प्रांजल कांबळे यांच्यासह विविध समितीचे प्रमुख व सदस्यांनी पुढाकार घेतला.
राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणच्या खेळाडूंची बाजी
|