बातम्या

महावितरणला देशात प्रथम क्रमांक

Mahavitaran ranks first in the country


By nisha patil - 12/9/2025 3:05:35 PM
Share This News:



महावितरणला देशात प्रथम क्रमांक
 

१०० पैकी ९३ गुण मिळवत महाराष्ट्र अव्वल

मुंबई, दि. ११ सप्टेंबर : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मानांकनात महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी साध्य झाली.

मानांकनात संसाधन पर्याप्तता, ऊर्जा परिवर्तन व नियामक प्रशासन या तीन घटकात महावितरणला पैकीचे गुण मिळाले. महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेश (८४.५ गुण) व गोवा (७४ गुण) क्रमांकावर आहेत.

गेल्या तीन वर्षांत सेवा सुधारणा, ४५ हजार मेगावॅट वीज खरेदी करार, शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज योजना व सौरऊर्जेवर भर या पावलांमुळे महावितरणचे गुणांकन उंचावले. त्यामुळे पुढील पाच वर्षांत ६६ हजार कोटींची बचत होऊन वीजदर कपात शक्य झाली आहे.


महावितरणला देशात प्रथम क्रमांक
Total Views: 73