दिवाळीआधी महावितरणचा वीज दरवाढीचा झटका!

Mahavitarans electricity tariff hike shocks before Diwali


By nisha patil - 6/10/2025 11:27:34 AM
Share This News:



    राज्यातील वीज ग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून दरवाढीचा शॉक बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली असून, या निर्णयाचा फटका घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांनाही बसणार आहे.

सणासुदीच्या काळात खरेदी आणि खर्च वाढताना वीज बिलाचाही अतिरिक्त भार नागरिकांवर पडणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी महावितरणने जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, सप्टेंबर महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge) आकारण्याचे आदेश दिले आहेत.

महावितरणने जुलैपासून वीज दर कमी केल्याचा दावा केला होता; मात्र, ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

नवीन वाढीनुसार —
    •    १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे वाढ
    •    ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर प्रति युनिट ९५ पैसे वाढ

या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वांनाच दरवाढीचा तडाखा बसणार आहे.


दिवाळीआधी महावितरणचा वीज दरवाढीचा झटका!
Total Views: 44