बातम्या

महावितरणचा वीज चोरांवर सर्जिकल स्ट्राईक

Mahavitarans surgical strike


By nisha patil - 9/30/2026 4:11:43 PM
Share This News:



महावितरणचा वीज चोरांवर सर्जिकल स्ट्राईक

येळवडे (ता. राधानगरी) येथे एकाच दिवसात १६ वीज चोरांवर कारवाई

१६ वीज ग्राहकांकडून ४ लाख ३४ हजार ५५३ रुपयांची वीज चोरी

कोल्हापूर दि. २९ सप्टेंबर २०२६ : महावितरणच्या राधानगरी उपविभागाकडून शिरगाव शाखा कार्यालय  अंतर्गत येणाऱ्या येळवडे(ता.राधानगरी) गावात एकाच दिवशी वीज चोरी विरोधात मोहीम राबवून तपासणी केली. या सर्जीकल स्ट्राईक मध्ये १६ वीज ग्राहकांकडे वीज चोरी आढळून आली असून त्यांनी एकूण ४ लाख ३४ हजार ५५३ रुपयांची वीज चोरी केली आहे. वीज ग्राहकांनी वीज चोरीची रक्कम दंडासह भरली नाही तर त्यांच्यावर गुन्हा नोंद होणार आहे.  

     महावितरणच्या राधानगरी उपविभागांतर्गत शिरगाव शाखा कार्यालय कार्यक्षेत्रातील येळवडे गावात महावितरणच्या पथकाने वीजचोरीविरोधात विशेष धडक मोहीम राबविली. या कारवाईत विद्युत कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत वीजचोरीची १४ प्रकरणे उघडकीस आली असून ग्राहकांनी एकूण १६,८०६ युनिटची वीजचोरी केली आहे. याची दंडासह एकत्रित रक्कम तीन लाख ९७ हजार ५५३ रुपये इतकी होते.  तर कलम १२६ अंतर्गत वीजचोरीची दोन  प्रकरणे आढळून आली असून त्यांच्या वीजचोरीची एकत्रित रक्कम ३७ हजार रुपये इतकी होते. एकाच गावात एकूण १६ प्रकरणे आढळून आली असून त्यावर महावितरणने केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरातील वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

महावितरणने वीजचोरीची कारवाई केलेल्या ग्राहकांत आनंदा रामचंद्र पाटील, तुकाराम गणपती सार्वेकर, सर्जेराव ज्ञानदेव शिंदे, दशरथ नावबा पाटील, गोपाळ नाना राबाडे, गणपती भाऊ पाटील, ज्ञानदेव रामचंद्र पाटील, मारुती लक्ष्मण राबाडे, नारायण रामचंद्र पाटील, संजय नारायण पाटील, आनंदा ज्ञानू मुसळे, धनाजी यशवंत पाटील, नारायण धोंडी पाटील, गोपाळ कृष्णा मिसाळ, सोनाबाई वसंत भाट या विजग्राहकांचा समवेश आहे. या कारवाई मोहिमेत शिरगाव शाखा अभियंता रोहित कोळी, स्वरूप गुरव (तारळे), प्रमोद पाटील (आवळी), प्रधान तंत्रज्ञ युवराज चौगुले व जनमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.

महावितरणची धडक मोहीम सुरूच राहणार – गणपत लटपटे

सामाजिक बदनामी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊन वीज वापरणे हेच ग्राहकांच्या हिताचे आहे. वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचे कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितले आहे.


महावितरणचा वीज चोरांवर सर्जिकल स्ट्राईक
Total Views: 27