विशेष बातम्या
औद्योगिक वीजग्राहकांसाठी महावितरणचा अद्यावत ‘स्वागत सेल’
By nisha patil - 8/13/2025 4:50:49 PM
Share This News:
औद्योगिक वीजग्राहकांसाठी महावितरणचा अद्यावत ‘स्वागत सेल’
कोल्हापूर | १३ ऑगस्ट २०२५ — औद्योगिक ग्राहकांना जलद व सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर मंडल कार्यालयात अद्यावत ‘स्वागत सेल’ कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या सेलमार्फत नवीन वीजजोडणी, भारवाढ/कपात, देयके व तक्रारींचे जलद निराकरण केले जाणार आहे.
राज्यात जानेवारी २०२४ पासून प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वागत सेल’ कार्यान्वित असून, कोल्हापूरसाठी ७८७५७६९०९० हा मोबाईल क्रमांक व swagatcell_kolhapur@mahadiscom.in हा ईमेल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या मागणीनंतर दोन दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करून तांत्रिक पाहणी व वीजजोडणीची प्रक्रिया सुरु केली जाते. तक्रारींनाही प्राधान्याने प्रतिसाद दिला जातो.
औद्योगिक वीजग्राहकांसाठी महावितरणचा अद्यावत ‘स्वागत सेल’
|