बातम्या

महावितरण अधिकाऱ्यांचा सीएमडी लोकश चंद्र यांच्या हस्ते गौरव*

Mahavitran cmd


By nisha patil - 5/5/2026 2:30:02 AM
Share This News:



*महावितरण अधिकाऱ्यांचा सीएमडी लोकश चंद्र यांच्या हस्ते गौरव*

संपूर्ण थकबाकी शून्य करणाऱ्या अकरा उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत*

कोल्हापूर, दि. 03 मे 2026 :* महावितरणची सर्व वर्गवारीतील थकबाकी शून्य करण्याची आव्हानात्मक कामगिरी पार पडणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील अकरा उपविभागीय अधिकाऱ्यांना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. राज्यात संपूर्ण थकबाकी शून्य करणारे एकूण अकरा उपविभाग असून हे सर्व अकरा उपविभाग कोल्हापूर परिमंडलातील आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ तर सांगली जिल्ह्यातील दोन उपविभागांचा समावेश होतो. येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठक हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना लोकेश चंद्र म्हणाले, ‘कोल्हापूर परिमंडलाचे ग्राहक सेवा, देखभाल दुरुस्ती, थकबाकी वसुली, स्मार्ट मीटर अशा सर्वच निकषांत आघाडीवर राहिले आहे. येथून पुढेही असेच चांगले काम करा. कोल्हापूरचा ग्राहक हा प्रामाणिक असून त्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा द्या. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करा. सुरक्षा साधने वापरून काम करा. अपघात शून्य होण्याकरता प्रयत्न करा. ग्राहकांना निर्धारित वेळेत सर्व सेवा द्या. एका कार्यालयातील चांगल्या कामाचे अनुकरण करावे.’ 

 

*शून्य थकबाकी करणारे अधिकारी व उपविभाग –* नागेश बसरीकट्टी(नेसरी), दयानंद अष्टेकर(आजरा), शीतल वनारसे(शिरोळ), शरद परीट(गगनबावडा), गिरीश भोसले(कदमवाडी), दयानंद कमदगी(कळे), सारिका शेळके(कोडोली), रणजीत पाटील(पन्हाळा), समीर अत्तार(परिते), संजय बालटे(सावळज), अंबादास कटकधोंड(खानापूर)

यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) सचिन तालेवार , पुणे प्रादेशिक संचालक सुनिल काकडे, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंते गणपत लटपटे, अमित बोकील, पुनम रोकडे, कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

  


महावितरण अधिकाऱ्यांचा सीएमडी लोकश चंद्र यांच्या हस्ते गौरव*
Total Views: 14