ताज्या बातम्या
महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 8/5/2025 11:59:43 PM
Share This News:
महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (दि. ०८): येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती सक्षम असून विजयी होईल, असा विश्वास आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, "लाडकी बहीण योजना, मोफत उच्च शिक्षण, एस.टी. प्रवास सवलत, ५०६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, रु.१०० कोटींचे रस्ते विकास, रंकाळा तलाव सुशोभिकरण यांसारख्या जनहिताच्या निर्णयामुळे नागरिकांचा कौल महायुतीच्या बाजूने आहे." जनसंपर्क वाढवून, नवमतदार नोंदणी व शाखा उद्घाटनांवर भर द्यावा, असेही त्यांनी सुचवले.
"महायुती ही आधीपासूनच सक्षम असून कोणावरही अवलंबून नाही. अनेक नवीन चेहरे पक्षात येत असले तरी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच यश मिळेल," असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हा व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम – आमदार राजेश क्षीरसागर
|