राजकीय
शहराच्या दुर्दशेला महायुती जबाबदार : आमदार सतेज पाटील भ्रष्ट कारभाराचा काँग्रेसकडून पंचनामा
By nisha patil - 4/1/2026 11:10:33 AM
Share This News:
शहराच्या दुर्दशेला महायुती जबाबदार आहे.असा घणाघात करत आमदार सतेज पाटील यांनी मनमानी व भ्रष्ट कारभार करणाऱ्या भाजपवर संताप व्यक्त केला.
काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयंत आसगावकर आणि ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील विकासाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात आला.
यावेळी शहरातील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, कचरा व्यवस्थापनातील अपयश, टक्केवारी प्रथा तसेच शेकडो कोटी रुपये खर्च करूनही झालेला निकृष्ट विकास याकडे लक्ष वेधण्यात आले. प्रशासकराजामुळे कोल्हापूर शहराची मोठी दुर्दशा झाली असून याला थेट महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल आणि “काँग्रेसच भारी ठरणार” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला राजेश लाटकर, दौलत देसाई, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, आनंद माने, माजी महापौर वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, स्वाती यवलुजे, शोभाताई बोंद्रे, हरिदास सोनवणे, भारती पवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे, बाळासाहेब सरनाईक, वेदवती मोहीते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराच्या दुर्दशेला महायुती जबाबदार : आमदार सतेज पाटील भ्रष्ट कारभाराचा काँग्रेसकडून पंचनामा
|