राजकीय
लाडक्या बहिणींच्या जोरावर महायुती सज्ज; प्रभाग ९, १०, २० मध्ये विजयाचा निर्धार
By Administrator - 1/13/2026 1:38:26 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रचार वेग घेत असल्याचे चित्र दिसत आहे. याच अनुषंगाने महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक ९, १० आणि २० साठी आयोजित विजय निर्धार सभेला मोठा प्रतिसाद लाभला.
या सभेत महायुतीच्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट शब्दांत आवाहन केले की, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि स्थिर नेतृत्व गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात ठासून सांगितले.
विशेष बाब म्हणजे या विजय निर्धार सभेला ‘लाडक्या बहिणी’ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांचा वाढता विश्वास महायुतीसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. उपस्थित महिलांनी घोषणाबाजी करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला.
सभेदरम्यान विकासकामे, नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच कोल्हापूर शहराच्या भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर भूमिका मांडण्यात आली. महायुतीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता येणाऱ्या निवडणुकीत ही लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती आपली ताकद दाखवणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
लाडक्या बहिणींच्या जोरावर महायुती सज्ज; प्रभाग ९, १०, २० मध्ये विजयाचा निर्धार
|