राजकीय

महायुतीने आधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा सतेज पाटील यांचा टोला

Mahayuti should first earn the trust of its own workers Satej Patils advice


By nisha patil - 12/31/2025 10:54:40 AM
Share This News:



कोल्हापूर : सगळ्या वाईट काळात काँग्रेसची व आमच्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांना महापालिकेत उमेदवारी देऊ शकलो. शेवटच्या घटकाला दोन तीन लोकसांठी ॲडजेसमेंट करावी लागली.

पण, ९९ टक्के आमची यादी ही निष्ठावंतांचा मेळा आहे. महायुतीला मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करता आली नाही. त्यांनी कोल्हापुरातील लोकांचा विश्वास संपादन करण्याआधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा असा टोला काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

आमदार पाटील म्हणाले, जे स्वत:चे उमेदवार ठरवू शकत नाहीत ते विकासकामे काय करणार आहेत. महायुतीला स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करता आला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत यादी जाहीर करता आली नाही. याचा अर्थ कार्यकर्त्यांवर त्यांची पकड नाही. स्वत:च्या कार्यकर्त्यांना जे न्याय देऊ शकले नाहीत ते कोल्हापूर शहरातील नागरिकांना काय न्याय देणार असा सवाल आमदार पाटील यांनी केला.


महायुतीने आधी स्वत:च्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा सतेज पाटील यांचा टोला
Total Views: 30