राजकीय
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची एकमताची घोषणा
By nisha patil - 12/20/2025 11:07:00 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. १९ : येत्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची महायुती एकत्र लढणार असल्याचा निर्णय आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाग घेतले.
बैठकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एक उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे, जी प्रत्येक प्रभागातील इलेक्टिव्ह मेरीट असलेल्या सक्षम उमेदवारांची प्राथमिक चाचणी करेल. या उपसमितीत शिवसेना पक्षाकडून युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम आणि दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख यांचा समावेश आहे. भाजपकडून आमदार अमल महाडिक आणि प्रा. जयंत पाटील हे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत आणि संदीप कवाळे मुख्य कमीेटी सदस्य आहेत.
या उपसमितीची पुढील बैठक उद्या पार पडणार असून, त्यानंतर जगांवर कोण लढणार हे प्राथमिक पातळीवर निश्चित होईल. नंतर या समितीकडून वरिष्ठ नेत्यांना अहवाल सादर करून अंतिम जागा वाटपाच्या निर्णयासाठी सल्ला घेण्यात येईल.
महायुतीचे नेते पक्षांनी एकत्र लढण्यावर एकमत झाल्यामुळे, कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचा एकत्रित प्रचार व उमेदवार नियोजन अधिक प्रभावीपणे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील दिवसांत जागावाटप, उमेदवारांवर चर्चा आणि निवडणूक रणनितीवर अधिक स्पष्टता येईल.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची एकमताची घोषणा
|