राजकीय
गडहिंग्लजमध्ये महायुतीची कोपरा सभा; महेश जाधव यांची उपस्थिती
By nisha patil - 2/12/2025 12:59:27 PM
Share This News:
गडहिंग्लज:- गडहिंग्लज नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार मा. गंगाधर हिरेमठ आणि महायुतीच्या नगरसेवकांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. 3 मध्ये कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेस भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रमुख उपस्थिती लावून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे यांच्यासह इतर मान्यवर, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या तयारीत जोरकसपणे सुरू असलेल्या या प्रचारसभेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मा. महेश बाळासाहेब जाधव, जनसंपर्क कार्यालय, कोल्हापूर.
गडहिंग्लजमध्ये महायुतीची कोपरा सभा; महेश जाधव यांची उपस्थिती
|