राजकीय
चंदगडमध्ये महायुतीची शक्तिप्रदर्शन सभा .. मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांची हजेरी
By nisha patil - 1/12/2025 11:45:42 AM
Share This News:
चंदगड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 निमित्ताने चंदगड येथे महायुतीची भव्य सभा पार पडली. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या सभेला कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, तसेच महायुतीतील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंदगड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा यशस्वी करण्यासाठी विशेष समन्वय साधणारे मा. महेश बाळासाहेब जाधव – जनसंपर्क कार्यालय, कोल्हापूर यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले.
चंदगडमधील या प्रभावी शक्तिप्रदर्शनामुळे महायुतीच्या निवडणुकीतील रणनीती आणि तयारीला मोठी गती मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
चंदगडमध्ये महायुतीची शक्तिप्रदर्शन सभा .. मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांची हजेरी
|