राजकीय
तारदाळमध्ये महायुतीचा जनसंपर्क दौरा — आवाडे–खोबरे यांच्या प्रचाराला गती
By nisha patil - 4/2/2026 3:40:06 PM
Share This News:
तारदाळमध्ये महायुतीचा जनसंपर्क दौरा — आवाडे–खोबरे यांच्या प्रचाराला गती
लोककल्याणकारी योजनांवर विश्वास — नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत प्रचाराला बळ
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची जि.प. मतदारसंघातील भाजपा–महायुतीच्या उमेदवार सानिका राहुल आवाडे व तारदाळ पं.स. मतदारसंघातील उमेदवार प्रियांका प्रवीण खोबरे यांच्या प्रचारार्थ गौरीशंकर नगर, तारदाळ येथे आमदार राहुल आवाडे व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक जनसंपर्क दौरा उत्साहात पार पडला.
या दौऱ्यात केंद्र व राज्यातील भाजप सरकारमुळे लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून सर्वांगीण व शाश्वत विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिक, माता–भगिनी व युवकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद महायुतीच्या प्रचाराला बळ देणारा ठरला.
तारदाळमध्ये महायुतीचा जनसंपर्क दौरा — आवाडे–खोबरे यांच्या प्रचाराला गती
|