बातम्या
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीची गोव्यात रणनीती! फडणवीसांशी चर्चेनंतर नेत्यांची फिल्डिंग
By nisha patil - 10/28/2026 2:08:40 PM
Share This News:
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीची गोव्यात रणनीती! फडणवीसांशी चर्चेनंतर नेत्यांची फिल्डिंग
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड उद्या, गुरुवारी होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, अध्यक्षपदाच्या निवडीत बाजी मारण्यासाठी दोन्ही गटांकडून रणनीती आखली जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीची व्यूहरचना करण्यासाठी आणि गोकुळच्या सदस्यांशी चर्चा करण्यासाठी महायुतीचे नेते गोव्याला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच महायुतीचे नेते गोव्याला गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत महायुती नेमकी कोणती खेळी करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, समविचारी आघाडीचे सदस्य सहलीवरून आज कोल्हापुरात परतणार आहेत. त्यानंतर आमदार सतेज पाटील सदस्यांशी बैठक घेऊन पुढील रणनीती निश्चित करणार आहेत. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या निवडीत गोकुळची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीची गोव्यात रणनीती! फडणवीसांशी चर्चेनंतर नेत्यांची फिल्डिंग
|