बातम्या

म्हैशाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच*

Maishal


By nisha patil - 3/17/2026 9:46:01 PM
Share This News:



*म्हैशाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच*

*प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची डोळेझाक* 

म्हैशाळ बंधाऱ्याच्या ठेकेदाराने कृष्णा नदीमध्ये कामासाठी चुकीचा बांध घातल्यामुळे आणि तो पावसाळ्यापूर्वी काढला नाही त्यामुळे कनवाड येथील जमीन वाहून गेली त्याजमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे 

.भविष्यात गॅरेजच्या प्रभावामुळे कनवाड हद्दीतील जमिनीस धोका आहे त्यामुळे वाहून गेलेल्या जमिनीस संरक्षक बांध घालावा

 बैरेजच्या कामासाठी ,पोच रस्ता ,भराव तसेच पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. 

बैरेजच्या खालील शिरोळ तालुक्यातील गावांना उन्हाळ्यामध्ये शुद्ध पाणी मिळण्यासाठी धरणामध्ये राखीव साठा असला पाहिजे .

या मागण्या घेऊन गेली कित्येक दिवस शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पण तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळेझाक करून दडपशाहीचा वापर करून ठेकेदारलाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण शेतकरी सुद्धा आपल्या मागण्यावर ठाम असून भविष्यामध्ये याही पेक्षा उग्र आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी घेतला आहे .

यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील राकेश जगदाळे वाजिद इनामदार संभाजी जाधव खालीद इनामदार अमर खाडे हमीद पटेल भुषण गंगावणे मोहम्मद इनामदार इ.शेतकरी उपस्थित होते.


म्हैशाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच*
Total Views: 10